पाण्याची खरमरीत बौद्धिक
स्वाती कर्वे
१२ फेब्रुवारी २०२६
“पाण्याशप्पथ भाग २" या प्रदीप पुरंदरे यांच्या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा म्हणून पुस्तकातली नुसती शीर्षके जरी द्यायची म्हटलं, तरी त्याची शब्दसंख्या सहज हजारच्या पुढे जाईल. या पुस्तकात पुरंदरे यांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक करणारी नंदा खरे यांची प्रस्तावना आहे. पुस्तकात एकूण १५ प्रकरणे असून उपप्रकरणे लक्षात घेता ती एकूण ४२ होतात. यात पुरंदरे यांनी पाणी या विषयासंदर्भात लिहिलेल्या २०१७ ते २०२० या…